श्रीरामकृष्ण सेवाश्रम
परमपूज्य गुरुदेवांच्या भक्तांचा एक खाजगी, घरगुती व सेवाभावी प्रयत्न
निःशुल्क सेवा उपक्रम
सध्या श्री दत्त देवस्थान ट्रस्ट ह्या न्यासाच्या बाबतीत उद्भवलेल्या कायदेशीर पेचामुळे येथील कारभारात व्यवस्थापकीय मर्यादा निर्माण झालेल्या आहेत. दर्शनासाठी श्री दत्त देवस्थान ट्रस्ट, नगर येथे येणाऱ्या परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांच्या भक्तांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा निःशुल्क उपलब्ध करून देण्यासाठी अनेक ज्येष्ठ भक्तांनी एकत्र येऊन ह्या 'श्री रामकृष्ण सेवाश्रम' उपक्रमास त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभ दिवसापासून सुरवात केली आहे. श्रीदत्त जयंती २०२३ ह्या दिवशी ह्या उपक्रमास एक महिना पूर्ण होतो आहे.
इच्छुक भक्तांना ह्या उपलब्ध निःशुल्क सेवांचा जरूर लाभ घेता येईल.
श्रीरामकृष्ण सेवाश्रम ह्या संस्थेच्या संचालकांनी कळविल्याप्रमाणे सध्या खालील निःशुल्क सेवा सुरु करण्यात आल्या आहेत.
सकाळी व दुपारी चहापान
सकाळी अल्पोपहार
मध्याह्नभोजन
दुपारच्या विश्रांतीची आणि प्रसाधनांची सोय
रात्रीचे हलके जेवण
ह्या सर्व सेवांचा लाभ घेण्यासाठी संपर्क -: श्री दादा अमृतकर, श्रीनिवास, श्री दत्तक्षेत्राच्या मागील बाजूची गल्ली, वेदांत नगर, प्रोफेसर कॉलनी रोड, सावेडी, अहमदनगर - मोबाईल क्रमांक - 9834194073 / 9422751826